पक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'

पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

राजीव कासले | Updated: May 23, 2023, 02:49 PM IST
पक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी' title=

Uddhav Thackeray : पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे पक्षवाढीसाठी 'मिशन चावडी' (Mission Chawadi) राबवणार आहेत. गावोगावी चावडीवर जाऊन काही माणसं पक्षाचा प्रचार करणार आहेत. या चावडी मिशनपासून नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना दूर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या चावडी मिशनमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला जाणार आहे. गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलेली कामं आणि उद्धव ठाकरेंची कामं हे लोकांमध्ये जाऊन सांगतली जाणार आहेत. 

पक्षाचा आढावा घेणार
तसंच सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालातले मुद्दे गावागावांत मांडण्याचं काम केलं जाणार आहे. गाव, तालुका, जिल्हापातळीवर पक्षाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली जाणाराय. चिन्हासह पक्षही निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या ताब्यात दिल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या मिशनपासून केली जाणार आहे. जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेवून शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहितीही घेतली जाणार आहे. 

काय आहे मिशन चावडी?
उद्धव ठाकरेंची काही खास माणसं गावोगावी चावडीवर जाऊन पक्षाच आढावा घेणार आहेत. चावडीवर लोकांच्या भेटीगाठी घेऊन ते सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. शिंदे गट आणि भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्णय करत आहे, हे लोकांना समजावून सांगितलं जाणार आहे. प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना बेकायादेशीर ठरवण्यात आलं आहे, प्रतोद म्हमऊन सुनील प्रभू आणि गटनेते म्हणून अजय चौधरीच आहेत यावर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलं आहे हे जनतेला पटवून दिलं जाणार आहे. 

भाजपही अॅक्शन मोडवर
लोकसभेसाठी (Loksabha 2023) महाराष्ट्र भाजप (BJP) अॅक्शन मोडवर आलंय. भाजपने राज्यात लोकसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवलंय. 30 मे ते 30 जूनदरम्यान हे संपर्क अभियान असणार आहे. लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करुन दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदार संघात विकास यात्रेचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील मोठी कामे विविध घटकांना प्रत्यक्ष जागेवर घेऊन दाखवली जाणार आहे. महिनाभर चालणाऱ्या अभियानावर दिल्लीतील नेत्याचं लक्ष असणार आहे. महाराष्ट्रातील महासंपर्क अभियानाची जबाबदारी आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर देण्यात आलीय.