विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.

राजीव कासले | Updated: Sep 6, 2024, 09:53 PM IST
विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार? title=

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. महायुतीसोबत जाऊनही लोकसभेला फारसे यश मिळाले नसल्यानं अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election 2024) महत्त्वाची आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केलंय. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) चाचपणी सुरू आहे.. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून जागावाटपाबाबत (Seat Sharing) भूमिका मांडलीये..

विधानसभेला अजितदादांना हव्यात 60 जागा च्या निवडणुकीच्या तुलनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत 60 जागा लढण्याची तयारी आहे. तर यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरीटवर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. महायुतीत निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप केले जाणार, महायुतीतील तीनही नेते एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास करून त्याठिकाणी कोणता पक्ष मजबूत आहे, यावर जागावाटपाचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय..

अजित पवारांच्या भूमिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं म्हटलं. तर अजित पवारांना राधाकृष्ण विखे पाटलांनी जागावाटपाबाबतची विधानं टाळण्याचा सल्ला दिलाय.. काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपनं आपल्याला विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिल्याची आठवण करुन दिली होती. तर विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनीही 80 ते 100 जागांची मागणी करत महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळव्यात, अशी भूमिका मांडली होती..

 

सध्या अजित पवारांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतंय.  त्यातच आता अजित पवारांनी 60 किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढवण्याची दाखवलेली तयारी, यामुळे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळणार की, दादा वेगळी पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे...