Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या सुनावणीची आंतरराष्ट्रीय चर्चा सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात सिंगापूरच्या सरन्यायाधीशांनी हजेरा लावली. मुंबई हायकोर्टातील मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी आता 11 सप्टेंबरला होणार आहे.
दोन दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे आज सिंगापूरच्या सरन्यायाधीशांनी जवळपास अर्धातास मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उपस्थिती लावली. त्यामुळे मराठा आरक्षणाची आजची सुनावणी संपूर्ण देशात लक्षवेधी ठरली.
या सुनावणीला देशभरातून अनेक वकिलांनी हजेरी लावली होती. मुंबई उच्च न्यायालयात सिंगापूरच्या सरन्यायाधीशांनी हजेरी लावण्याची ही दुसरी वेळ आहे...सिंगापूरचे सरन्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रथमच एकत्र न्यायासनावर होते.
बार्शीत मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय. मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीत घेण्याची मागणी मराठा समाजानं केलीय. 15 दिवसांत मागणी मान्य करा अन्यथा उपोषणाला बसू, असा इशारा मराठा समाजानं दिलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय...पाच दिवसांपासून राजश्री उंबरे पाटील या भगिनी उपोषणाला बसल्या...धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण अंतर्गत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. .मराठवाड्याच्या विविध मागण्यांसंदर्भात उंबरे यांचे उपोषण सुरूये...मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करून त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कोठ्यातून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्ववत करावं, आणि शेतकरी कामगारांसह शेतमजुरांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं या मागण्या करत उंबरे यांनी उपोषण सुरू केलंय...पाच दिवस होऊनही सरकारने दखल घेतली नाही त्याचबरोबर राजश्री उंबरे यांची प्रकृतीही खालावलीये...17 सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला...मात्र, क्रांती चौकात सुरू असलेलं हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढत आंदोलकांना ताब्यात घेतलंय...