शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी

महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते

Updated: Dec 17, 2022, 05:45 PM IST
शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी title=

Shinde Group vs Thackeray Group : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे (MahaVikas Aghadi Morcha) आज मुंबईत (Mumbai) महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पण  एकीकडे महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरू असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठे खिंडार पडलंय.

ठाकरे गटाचे आमदार गैरहजर
महाविकास अघाडीचा महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या सोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याचे दिसून आलंय. चेंबूर मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्धघाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजकिय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय.

कोण आहेत प्रकाश फातर्फेकर
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापन केला. शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 14 आमदारच राहिले, यापैकीच एक म्हणजे  चेंबूर मतदारसंघातले आमदार प्रकाश फातर्फेकर. पण आता ठाकरे गटाची साथ सोडून आमदार प्रकाश फातर्फेकर हे सुद्धा शिंदे गटात सामील होणार का? याबाबात चर्चा सुरु झाली आहे. 

हे ही वाचा : 'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री
मविआच्या या मोर्च्यात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. यामध्ये पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अशा प्रकारच्या जाहीर मोर्चात रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि तेजस ठाकरे पहिल्यांदाच सहभागी झाले होते. याआधी अनेकदा तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर तेजसला युवासेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. 

रश्मी ठाकरेंनी मनं जिंकली

महामोर्चात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या रश्मी ठाकरे यांनी एकही शब्द न बोलता सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचीच मनं जिंकली. कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरे आज मोर्चामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. संपूर्ण ठाकरे कुटुंब शनिवारी मोर्च्यात सहभागी झालं होतं. पण चर्चा झाली ती रश्मी ठाकरे यांची. साधी साडी, कुठलही मेकअप नाही की उन्हाची परवा नाही... मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांची विचारपूस करताना...मोर्च्यात ठाकरे कुटुंबाच्या या Home Minister चं वलय दिसून आलं.