कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. शिंदे गट (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबातील एक सदस्य शिंदे गटात येणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावेळेपासून ती व्यक्ती ठाकरे कुटुंबात वावरत होती. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ती व्यक्ती निकटवर्तीय मानली जाते. ती व्यक्ती शिंदे गटाला पाठिंबा देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या देवीची वाजत गाजत मिरवणूक निघाली आहे. त्या मिरवणूकीतही ती व्यक्ती सामील होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर राज्यभरातून अनेक शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यातच आता ठाकरे कुटुंबाबरोबर 24 तास असणारी व्यक्तीही शिंदे गटात जात असल्याने हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.