आदित्य ठाकरे म्हणतात 'गद्दार' तर शिंदे गट म्हणतं जनताच ठरवेल

आदित्य ठाकरे आणि शिंदे गटात आता 'गद्दार'वरुन संघर्ष

Updated: Jul 22, 2022, 03:48 PM IST
आदित्य ठाकरे म्हणतात 'गद्दार' तर शिंदे गट म्हणतं जनताच ठरवेल title=

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून शिंदे गटाचा वारंवार गद्दार असा उल्लेख केला जातोय. यावर शिंदे गटाकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात आहे.

सुहास कांदे यांचं आव्हान
जिल्हाभरात ठिकठिकाणी फिरून शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संपर्क साधत आहेत. आज नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) चांगलेच आक्रमक झाले. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. 

आदित्य ठाकरे यांचं उत्तर 
कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली. जी वचनं होती ती पूर्ण केली आहेत, आपलं सरकार आलं तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन असं आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर करुन दिले. यानंतरही आरोप केले जात आहेत. या आरोपांना मी उत्तर देत बसणार नाही, गद्दार नसते तर उत्तरं दिली असती, गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी असं नसते अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गद्दारी का केली याचं उत्तर आधी द्याव असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी केलं. 

'गद्दार म्हणणं चुकीचं' 
दरम्यान, शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेसाठी अनेकांनी आयुष्य समर्पित केलंय. आम्हाला गद्दार म्हणणं चुकीचं असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय. तर गद्दार कोण आहे याचं उत्तर हे वरळी विधानसभेतील मतदार देतील, असं म्हणत खासदार राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे भाजप, सेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. आदित्य ठाकरेंना हरवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीनं प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केलाय