Maharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.

कृष्णात पाटील | Updated: Jul 14, 2023, 02:08 PM IST
 Maharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती title=

Maharashtra Portfolio : नवीन मंत्र्यांचं आजच खातेवाटप होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे (Maharashtra Governor) गेली आहे, त्यांची सही झाली की थोड्याच वेळेत ती जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. त्यामुळे कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबतची उत्सुकता संपणारंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 
अर्थ आणि नियोजन - अजित पवार
सहकार- दिलीप वळसे पाटील
वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ
अन्न व नागरी - छगन भुजबळ
महिला व बालविकास- आदिती तटकरे