Maharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार'

'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही'

Updated: Jun 22, 2022, 08:52 PM IST
Maharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार' title=

Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा (CM Uddhav Thackeray) राजीनामा देणार तसंच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला दिल्याचं वृत्त पसरलं होतं. पण या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या शक्यतांना पूर्णविराम लावला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानावर मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले आहेत. मोह माया, सत्ता यांचा आम्हाला अजिबात लोभ नाही, आम्ही लढणारे लोक आहोत, लढत राहू, शेवटी सत्याचा विजय होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी येऊन महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सदभावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील, तसंच अविश्वास ठराव मांडल्यास आम्ही बहुमतही सिद्ध करु असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची अशा प्रकारची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे, मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.