दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
SEBC आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजाला EWS च्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला किमान EWS आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कसं असणार हे आरक्षण?
- राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा लाभ
- त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार घेऊ शकतात 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ
- राज्य सरकरने जारी केला जीआर
- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
- राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता
- आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा सरकारचा निर्णय