दिलासादायक! महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?, आज पहिल्यांदाच 'इतकी' रुग्णसंख्या

राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे

Updated: Oct 25, 2021, 08:12 PM IST
दिलासादायक! महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?, आज पहिल्यांदाच 'इतकी' रुग्णसंख्या title=

मुंबई : गेल्या जवळपास दीड वर्षांपासून राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातलं होतं, पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Corona Second Wave) आलेख ओसरताना दिसतोय. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यातच आज दिलासा देणारी बातमी आहे. आज पहिल्यांदाच कोरोनाची रुग्णसंख्या (Coroan Cases in Maharashtra) एक हजारांच्या खाली नोंदवली गेली आहे.

गेल्या चोवीस तासात राज्यात 889 रुग्ण आळढले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. दिवसभरात 1 हजार 586 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 97.47 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात सध्या 23 हजार 184 सक्रिय रुग्ण संख्या आहे. सध्या राज्यात 1 लाख 83 हजार 92 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 957 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. चांगली बातमी म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यात आज एकही रुग्ण आढळला नाही. 

मुंबईत रुग्णसंख्येत घट

मुंबईतही आज दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहिला मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 263 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.