मुंबई : राज्यासह मुंबईला ज्याची भिती होती तेच पुन्हा घडतंय. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update ) झपाट्याने वाढ होतेय. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात आज कोरोना रुग्णसंख्या ही 3 हजार पार गेली आहे. तर मुंबईती कोव्हिड रुग्णांचा आकडा हा 2 हजारच्या नजीक येऊन ठेपला आहे. तसेच सक्रीय रुग्णांचाही संख्या वाढली आहे. (maharashtra corona update 10 june today 3 thousand 81 positive patients found in state know how many patients in mumbai)
राज्यात आज (10 जून) 3 हजार 81 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 24 तासांमध्ये मुंबईत 1 हजार 956 जणांना कोरोना झाला आहे. गुरुवारी राज्यातील आकडा हा 2 हजार 813 इतका होता. तर मुंबईत 1 हजार 702 इतके पॉझिटिव्ह होते.
दैनंदिन रुग्णांसह सक्रीय रुग्णांमध्ये म्हणजेच कोरोनावर उपचार घेत असलेल्यांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सध्या 13 हजार 229 जणांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी सक्रीय रुग्णांचा आकडा हा 11 हजार 571 इतका होता.
झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे जनतेचं लक्ष लागून आहे. महापालिका आणि राज्य सरकारने याआधीच कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाहीये. त्यासोबतच साथीचे आजारही वाढले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार निर्बंध लावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81