मोठी बातमी! राज्यात 'या' तारखेपासून कॉलेज सुरु होणार, उदय सामंत यांनी केली घोषणा

कॉलेज सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमावली तयार करण्यात आली आहे

Updated: Oct 13, 2021, 04:44 PM IST
मोठी बातमी! राज्यात 'या' तारखेपासून कॉलेज सुरु होणार, उदय सामंत यांनी केली घोषणा title=

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार (Maharashtra Collage Reopen) याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळी नियमावली असणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccination) घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवा असे निर्देशही देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी, विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील, कोरोनाचा प्रदूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील, डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसंच वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आदेशही देण्यात आले आहेत. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांच लसीकरण पूर्ण झालं पाहिजे अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.