मुंबई : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाल्याचं अंदाज आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचं जाहीर केलं.
जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरपर्यंत मर्यादीत मदत)
बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरपर्यंत मर्यादीत मदत)
बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर(२ हेक्टरपर्यंत मर्यादीत मदत)
ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल(२ हेक्टरपर्यंत मर्यादीत मदत)
तर यात फळबागांबाबत कोणतीही स्पष्ट सूचना दिसून आलेली नाही.
ही मदत नेहमीप्रमाणे २ हेक्टरपर्यंत मर्यादीत असणार आहे. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याची ५ हेक्टर जमीन असेल, तरी देखील त्याला २ हेक्टर जमीनीसाठीच मदत मिळणार आहे. २ हेक्टराच्या खाली जमीन असलेल्या शेतकरी अल्पभूधारक मानला जातो.