मुंबई : भाजपचा मित्र पक्ष अलेली शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत एकत्र लढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केलेय. असे असताना भाजपकडून शिवसेनेला गोंजरण्यात येत आहे. याआधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने आमच्यासोबत राहावे आणि एकत्र निवडणूक लढवावी, असे आवाहन केलेय.
भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य पक्ष एकत्र येत आहेत. विरोधक वोट बॅंक संघटीत करीत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने एकत्रच लढले पाहिजे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास मोठे नुकसान होईल. तसेच त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत. बुधवारी राज्यातील फडणवीस सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांनी निवडणूक एकत्र लढविण्यावर भाष्य केले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला नाही वाटत दोन्ही निवडणुकी एकत्र होतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्यातर त्याला महाराष्ट्र भाजपकडून विरोध करण्यात आलाय. त्याचवेळी मीडियाकडून आलेल्या रिपोर्टबाबत त्यांनी चुकीचा असल्याचे म्हटलेय. दिल्लीतील एका एजेन्सीने सर्व्हेक्षण केलेय. या सर्व्हेमध्ये म्हटलेय, भाजपचे सहा खासदार आणि 50 आमदरांचे काम चांगले नाही. त्यामुळे भाजपला यामुळे पराभवाचा सामना करावा लागेल.
दरम्यान, भाजपने आपला सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपचे अधिकाधिक आमदार निवडणू येतील, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय.