Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?

Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे.   

Updated: Dec 6, 2022, 11:05 AM IST
Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार? title=
Maharashtra Cabinet Expansion next strategy of the disgruntled MLAs was decided bjp getting 60 per cent corporations after winter session nmp

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. राज्यात शिंदे - फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. मात्र येऊन येऊन एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) केव्हा होणार? हिवाळी अधिवेशन जवळ आलं आहे. 19 नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. तरीदेखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या कुठल्याही हालचाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यावर एकच कारण सांगत आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराला दिल्लीतून अद्याप हिरवा कंदिल मिळालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेले उतावळे आमदारांची अस्वस्था वाढतं जातं आहे. 

नाराज आमदारांची पुढची रणनिती ठरली?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये नवी फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली. इच्छुक आमदारांना महामंडळांवर वर्णी लावण्याचे गाजर दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल घोषणा हिवाळी अधिवेशनानंतर (Winter session 2022) करण्यात येणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion next strategy of the disgruntled MLAs was decided bjp getting 60 per cent corporations after winter session)

महामंडळाचे गाजर?

भाजपच्या आमदारांची (BJP MLA) संख्या अधिक आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळात भाजपच्या अधिक आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवाय महामंडळाच्या (corporation) वाटपातही भाजपला जास्त वाटा मिळावा यासाठी रणनिती ठरवली आहे. भाजपकडे 60 टक्के तर शिंदे गटाला 40 असा महामंडळासाठी फॉर्म्युला ठरला आहे. याचा परिणाम शिंदे गटात (Shinde group) अधिक अस्वस्था दिसून येतं आहे. 

...नाही तर विधान परिषदेवर पाठवा

महामंडळमध्ये शिंदे गटाला दुय्यम स्थान मिळणार असेल तर विधान परिषदेच्या रिक्त 6 जागांवर शिंदे गटांच्या आमदारांना प्राधान्य द्या, अशी मागणी आता जोर धरतंय. त्यामुळे शिंदे आणि भाजप गटातील आमदारांची नाराजी दूर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कशी दूर करणार हे पाहणे औत्सुकाचं ठरणार आहे.