Maharashtra Cabinet Expansion : 'या' उद्योजकाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद

शिंदे-फडणवीस सरकारचा (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटातून आणि भाजपमधून अशा प्रत्येकी 9 म्हणजे एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

संजय पाटील | Updated: Aug 9, 2022, 06:33 PM IST
Maharashtra Cabinet Expansion : 'या' उद्योजकाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद title=

मुंबई : अखेर अनेक दिवसांच्या विलंबानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटातून आणि भाजपमधून अशा प्रत्येकी 9 म्हणजे एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी या सर्वांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अशातच भाजपमधून उद्योजक आमदाराला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालं आहे. (maharashtra cabinet expansion miraj assembaly constituency mla suresh khade taking oath as a minister know his political journey and struggle)

सांगलीतील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सुरेश यांची मंत्री म्हणून ही दुसरी वेळ ठरली आहे. त्याआधी फडणवीस सरकारमध्ये काही महिन्यांसाठी त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती.

सुरेश खाडे यांचा अल्पपरिचय (Who Is Suresh Khade)

जन्म : 1 जून 1958, सांगली व्हीजेटीआयमधून (VJTI) वेल्डिंग डिप्लोमा, रौप्य आणि कांस्य पदक कोलंबो विद्यापिठातून डॉक्टरेट.

राजकीय प्रवास 

सुरेश यांनी 1999 साली जत या राखीव असलेल्या मतदारसंघातून आरपीआयच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  जत विधानसभा मतदारसंघातून 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार. - मिरज मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 सलग तिसऱ्यांदा आमदारकीची हॅट्रिक. मतदारसंघावर एकहाती पकड आणि वर्चस्व

अठरा विश्व दारिद्रयातून उद्योगाची निर्मिती सुरेश यांच्या घरची हलाखीची परिस्थिती. दोन वेळच्या जेवणाचे आबाळ. आई-वडिल, 6 बहिणी, अशोक आणि स्वत: सुरेश (शेंडेफल) असे 3 भाऊ. घरातील हलाखीच्या परिस्थितीचं भांडवलं न करता या तिन्ही भावांनी कुटुंबियांच्या मदतीने आणि पांठिब्याने परिस्थितीवर मात केली.

दत्तात्रय यांना माझगाव डॉकयार्डमध्ये वेल्डिंग एप्रेंटिसची संधी मिळाली. त्यांनी त्या नोकरीचा स्वीकार केला. दत्तात्रय यांच्यानंतर अशोक यांनाही तिथेच डॉकयार्डमध्येच हँडमॅन या पदावर कामाची सुरुवात केली. या दरम्यान अशोक यांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं.

अशोक यांनी जहाज डिझायनिंगची प्रशिक्षण घेतलं. तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. आता शिक्षणासह त्यांना कामाचाही तगडा अनुभव मिळाला होता. अशोक यांना या दरम्यान जर्मनीला प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. हीच संधी खाडे कुटुंबियांसाठी टर्निंग पॉइंट ठरली. अशोक यांना तगडा पगार आणि संधी मिळाली. मात्र काही काळानंतर नोकरी सोडून स्वत:चं उद्योग सुरु करण्याचा निर्धार, अशोक यांनी केला. दत्तात्रय, अशोक आणि सुरेश अशा तिघांच्या नावातील पहिल्या अक्षरावरून 'दास ऑफशोअर इंजिनीअरिंग' असं कंपनीला नाव दिलं. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दत्तात्रय, अशोक आणि सुरेश या तिन्ही भावांनी उद्योगविश्व उभं केलं.