आधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार

पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत. 

Updated: Nov 18, 2017, 02:03 PM IST
आधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार title=

मुंबई : पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत. 

या दोन्ही राज्यांतील १२९३ पोस्ट कार्यालयातून आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही पुढील वर्षापासून सुरु होणार आहे. या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत. त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करून घेता येणार आहे.

या सुविधेमुळे सध्या आधार कार्ड केंद्रावरील गोंधळ आणि त्यांच्या मर्यादित संख्येमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप कमी होणार आहे. 

पोस्टात आधार कार्ड काढण्याची सुविधा मिळाल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे. सध्या चार हजार कर्मचा-यांना आधार कार्ड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.