देखते ही रह जाओगे! कार्ल मार्क्स यांच्या 205व्या जयंतीनिमित्त मुंबईत महाभंडारा

Karl Marx Birth Anniversary : कार्ल हेनरिक मार्क्स यांचा जन्म 5 मार्च 1818 रोजी तत्कालीन प्रशियाच्या लोअर राईन प्रांतातील ट्रियर या जुन्या शहरात झाला. मार्क्सचे कुटुंब मूळतः अधार्मिक ज्यू होते, पण नंतर कार्लच्या जन्मापूर्वी औपचारिकपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

आकाश नेटके | Updated: May 5, 2023, 09:35 AM IST
देखते ही रह जाओगे! कार्ल मार्क्स यांच्या 205व्या जयंतीनिमित्त मुंबईत महाभंडारा title=

Karl Marx Birth Anniversary : कार्ल मार्क्स (Karl Marx) यांनी संपूर्ण जगाला एक नवीन दिशा दाखवली होती. जर्मनीचे (germany) महान विचारवंत कार्ल मार्क्स हे अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकीय सिद्धांतकार, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार आणि क्रांतिकारक या बिरुदावलीने ओळखले जातात. कार्ल मार्क्स हे जर्मन तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय सिद्धांतकार होते ज्यांचा आधुनिक इतिहासावर खोल प्रभाव होता. समाजवाद, साम्यवाद (Communism) आणि व्यवसायाच्या स्वरूपावरील त्यांच्या मतांनी 20 व्या शतकातील राजकीय दृष्टिकोनाला आकार दिला आणि आजही राजकीय आणि आर्थिक बाबींवर प्रभाव पाडत आहे. अशा या कार्ल मार्क्स यांचा आज 205वा जन्मदिवस आहे. 

जगभरात कार्ल मार्क्स यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबईत मात्र मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  साम्यवाद आणि समाजवादाचे प्रणेते कार्ल मार्क्स यांच्या 205 व्या जन्मदिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  धारावीत चक्क महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे. या महाभंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे पोस्टर सध्या संपूर्ण धारावी परिसरात लागले आहेत. इतक्या मोठ्या विचारवंताच्या जयंतीनिमित्त व्याख्यान किंवा सामाजिक कार्याचे आयोजन केले जाते. मात्र मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन केल्याने हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

काय म्हटंलय निमंत्रण पत्रिकेत?

"सस्नेह निमंत्रण! कॉ. कार्ल मार्क्स जन्मोस्तव महाभंडारा, शुक्रवार 5 मे 2023 सायं. 6 ते10 वाजेपर्यंत. स्थळ- शेकाप कार्यालय, पिवळा बंगला बस स्टॉप शेजारी, धारावी मुंबई - 17. कामगार-शेतकरी-कष्टकरी-बहुजन वंचित जनतेच्या मुक्तीचे तत्वज्ञान जगाला देणाऱ्या महामानवाचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता आपण अवश्य उपस्थित राहून महाभंडाऱ्याचा लाभ घ्यावा हे विनम्र आवाहन! व्यवस्थापक- साम्या कोरडे, अध्यक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना," असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे साम्या कोरडे यांनी सांगितले. "आपल्या देशातील महापुरुषांची जयंती आपण उत्साहात साजरी करतो. त्याप्रमाणेच कार्ल मार्क्स यांची जयंती वेगवगळे डाव्या विचारांचे पक्ष साजरे करतात. कार्ल मार्क्स हे नाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणण्यासाठी मार्क्स यांच्या जन्मदिनानिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे," असे साम्या कोरडे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, कार्ल हेनरिक मार्क्स यांचा जन्म 5 मार्च 1818 रोजी तत्कालीन प्रशियाच्या लोअर राईन प्रांतातील ट्रियर या जुन्या शहरात झाला. मार्क्सचे कुटुंब मूळतः अधार्मिक ज्यू होते, पण नंतर कार्लच्या जन्मापूर्वी औपचारिकपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारला. कार्ल मार्क्स यांचे वडील हे कुटुंबातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी धर्मनिरपेक्ष शिक्षण घेतले होते आणि ते व्यवसायाने वकील होते. त्यामुळे वडिलांनीच त्यांना सुरुवातीचे शिक्षण दिले होते.