Maharashtra TET Answer Key 2021 | पुणे : राज्य परीक्षा परीषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (MTET) उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी टीईटीची परीक्षा दिली होती, ते mahatet.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उत्तरपत्रिका (Maharashtra TET Answer Key 2021) पाहू शकतात. तसेच ती उत्तरपत्रिका डाऊनलोडही करु शकतात. (Maha TET Answer Key 2021 Maharashtra TET answer key 2021 released know how to download)
टीईटी पेपर 1 आणि 2 या दोन्ही विषयांच्या परीक्षेचं आयोजन हे 21 नोव्हेंबरला करण्यात आलं होतं. राज्य परीक्षा परीषदेने पेपर 1, पेपर II-गणित, विज्ञान आणि समाजशास्त्तर या विषयांची उत्तरतालिका अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली आहे. यासह राज्य परीक्षा परीषदेने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे.
Maha TET Answer Key अशी डाऊनलोड करायची
1. mahatet.in या अधिकृत वेबसाईटवर जा
2. वेबसाईटवर होमपेज ओपन होईल. तिथे Interim Answer Key या लिंकवर क्लिक करा.
3. नवीन विंडो ओपन होईल.
4. नवीन विंडो ओपन झाल्यावर Paper I Interim Answer Key, Paper II Maths Science Interim Key, Paper II Social Science Interim Answer Key या लिंकवर क्लिक करा.
5. विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला जी उत्तरपत्रिका हवी असेल, ती पीडीएफ डाऊनलोड होईल.
आक्षेप केव्हापर्यंत घेता येणार?
टीईटीच्या विदयार्थी 8 डिसेंबरपर्यंत या उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवू शकतात. विद्यार्थी त्यांची असलेली तक्रार ही mahatet2021.msce@gmail.com या मेलआयडीवर जाऊन नोंदवू शकतात.