वडाळा बेस्ट डेपोतल्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्री माधवी जुवेकर बोलल्या

बेस्ट कर्मचा-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. हा वाद वाढत असतांनाच यावर अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Nov 8, 2017, 04:16 PM IST
वडाळा बेस्ट डेपोतल्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्री माधवी जुवेकर बोलल्या title=

मुंबई : बेस्ट कर्मचा-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. हा वाद वाढत असतांनाच यावर अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उधळल्या गेलेल्या नोटा या खोट्या आहेत. तो फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पाहा माधवी जुवेकरांची प्रतिक्रिया 

बेस्टच्या वडाळा आगारातील हा संतापजनक व्हिडिओ असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री माधवी जुवेकर बेस्टमध्ये कामाला आहे. बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय. बेस्टचे अधिकारी खुलेआम नोटांची उधळपट्टी करत असल्याचं त्यात दिसतंय. बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागातली ही घटना आहे. बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीस डान्स करतेय आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर दौलतजादा उधळतायत, हे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.