किशोरी पेडणेकर आणि अमृता फडणवीस यांच्यात आता 'सिंगिंग वॉर', पेडणेकर यांचं हे गाणं ऐकलंत का

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातून अमृता फडणवीस यांना लगावला टोला

Updated: Aug 7, 2022, 01:14 PM IST
किशोरी पेडणेकर आणि अमृता फडणवीस यांच्यात आता 'सिंगिंग वॉर', पेडणेकर यांचं हे गाणं ऐकलंत का title=

Amruta Fadanvis vs Kishori Pednekar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमक नेहमीच पहायला मिळते. पण आता त्यांच्यात चक्क सिंगिंग वॉर रंगलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी चक्क गाणं म्हणत अमृत फडणवीस यांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला
झी मराठीवरील नुकताच 'बस बाई बस' हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना थेट उत्तरं दिली आहेत. कार्यक्रमात असाच एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या सुभोध भावे यांनी अमृता फडणवीस यांना 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकवलं.

हे गाणं ऐकवल्यानंतर तुमच्या समोर कोणत्या व्यक्तीचं नाव येतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नावं घेतलं.

किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी चक्क गाण्यातूनच प्रत्युत्तर दिलं आहे. 
एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचं नावं
मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले
त्यांना एका 'अमृताची' दृष्ट लागली हो
त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले हो
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली...

अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंकडून शिकावं
दरम्यान,  उद्धव आणि राज ठाकरेंनंतर (Uddhav And Raj Thackeray) आता दोघांचे चिरंजीवही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर आदित्य ठाकरेंदेखील सध्या 'शिवसंवाद' यात्रा करतायत. यावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून शिकावं असा टोला लगावला आहे.  आज प्रत्येक बापाचा पोरगा आला आहे. मग आमच्या उद्भवजींची मुलं आली तर आक्षेप का? आदित्य यांनी मेहनत घेतली आहे ते मेहनतीने इथपर्यंत आले आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.