मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेने गजानन किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. गजानन किर्तीकर यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचं आव्हान आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
गजानन किर्तीकर | शिवसेना | ४,६४,८२० |
गुरुदास कामत | काँग्रेस | २,८१,७९२ |
महेश मांजरेकर | मनसे | ६६,०८८ |
मयांक गांधी | आप | ५१,८६० |
नोटा | ११,००९ |