लोकसभा निवडणूक २०१९: बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूक २०१९ चं चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. 

Updated: Apr 29, 2019, 01:37 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ चं चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ९ राज्यांमध्ये ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीच्या चौथ्या महत्वाच्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ई्व्हिएममध्ये आज कैद होणार आहे. मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत.

मुंबईमध्ये देखील आज मतदान होत असल्याने अनेक बॉलिवूडकरांनी आज आपला निवडणुकीचा हक्क बजावला. सकाळपासूनच बॉलिवूड कलाकार मतदान करण्यासाठी बाहेर पडले.

अभिनेत्री कंगना रणावतने मतदानाचा हक्क बजावला. 

अभिनेते अनुपम खेर यांनी मतदानाचा हक्क बजावला

अभिनेत्री भाग्यश्री आणि सोनाली बेंद्रे यांनी देखील मतदान केलं.

अभिनेता आमीर खानने पत्नीसोबत मतदान केलं.

अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील मतदान केलं.

अभिनेत्री शुभा खोटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेते परेश रावल यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेते आणि गोरखपूरमधून भाजप उमेदवार रवी किशन यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री रेखा यांनी मतदानाचा हक्क बजावला