मुंबईत उद्यापासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार

 मुंबईत 1 जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार आहेत. 

Updated: May 31, 2021, 08:49 PM IST
मुंबईत उद्यापासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार title=

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईत 1 जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार आहेत. अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 सुरू राहणार. इतर दुकाने शनिवार व रविवार बंद राहणार आहेत.

इतर दुकाने ही रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूची दुकाने आलटून पालटून एकेक दिवस उघडी राहणार. पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोम, बुध व शुक्रवार सुरू राहतील तर समोरील दुकाने मंगळ व गुरूवार सुरू राहतील. त्यापुढील आठवड्यात डाव्या बाजूची दुकाने सोम,बुध व शुक्रवार सुरू राहतील तर समोरील दुकाने मंगळ व गुरूवार सुरू राहतील.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटिव्ह दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे निर्बंध शिथिल करण्यात येतील. असा आदेश सरकारने काल काढला होता.

दरम्यान आज मुंबईत कोरोनाचे 676 रुग्ण वाढले असून 5570 जणांनी कोरोनावर मात केली आहे.