मुंबईत 'या' ठिकाणी दोन दिवस पूर्णपणे बंद, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

मुंबई शहरातील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी या विभागात दोन दिवस पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय येथील सार्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.  

Updated: Apr 11, 2020, 10:18 AM IST
मुंबईत 'या' ठिकाणी दोन दिवस पूर्णपणे बंद, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका title=

मुंबई : शहरातील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी या विभागात दोन दिवस पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय येथील सार्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. कोरोनाचे वाढतं संकट पाहता आणि मुंबईत वाढत असलेली रुग्णांची संख्या यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना आता दणका द्यायला सुरुवात केली आहे.

कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी याठिकाणी दोन दिवसाच्या पूर्ण बंदमध्ये केवळ वैद्यकीय सेवा सुरु राहणार आहे. कुर्ला चुनाभट्टी भागात पोझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे . तसेच गर्दी कमी होत नाही, त्यामुळे दोन दिवसांचा पूर्ण बंद पाळण्यात येत आहे. 

मुंबईत पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना आता दणका द्यायला सुरुवात केली आहे. सुमननगर इथे नाकाबंदी करुन पोलिसांनी प्रत्येक गाडीची कसून तपासणी सुरु केलीय. या तपासणीत विनाकारण फिरणाऱ्यांना गाडीतून उतरवून रस्त्यावर उठाबशा काढण्याची शिक्षा दिलीय. आज सकाळपासून आता मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत.  

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली. दोन्हीकडे अजूनही भाजीमार्केटमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यांचं दिसत आहे. लॉकडाऊन असूनही भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळली.

प्रशासनाने एकसारखं सांगूनही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजीमार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा होणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर ही वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.