काही अटी शिथिल करून कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता

 राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती, ती बैठक आता सुरू आहे.

Updated: Jun 24, 2017, 03:33 PM IST
काही अटी शिथिल करून कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती, ती बैठक आता सुरू आहे. या बैठकीत दीड ते दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच कोणकोणत्या अटी शिथिल करायच्या यावरही चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचा संपूर्ण प्लान तयार असल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवेसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची अट सरकारसमोर ठेवली आहे.

मात्र ही कर्जमाफी सरसकट नसेल हे स्पष्ट आहे, तरीही ही सर्वात मोठी कर्जमाफी होईल असा दावा आतापासून सुत्रांनी करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या सुकाणू समितीने सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. जाहीर होणारी कर्जमाफी ही सरसकट कर्जमाफी नसली, तर ती सुकाणू समितीला मान्य होईल का? हा देखील एक प्रश्न आहे.