लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Updated: Jul 17, 2017, 06:16 PM IST
लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक  title=

मुंबई : लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत. सलीम असं या दहशतवाद्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त ऑपरेशनमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचा हा साथीदार आहे.

सलीम खान हा मुळचा उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचा राहणारा असून, फैजाबाद येथे पकडण्यात आलेल्या आयएसआयच्या एजंटचा सलीम खान फायनान्सर होता असा संशय तपास यंत्रणांना आहे.

भारतीय सैन्य दलाची महत्वाची गुप्त माहिती गोळा करणा-या आफताबला सलीम खानने आर्थिक साहाय्य केले होते. धक्कादायक म्हणजे सलीम खानने लष्कर ए तोयबाच्या मुझफ्फराबाद येथील कॅम्पमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं.

सलीम खान हा आयएसआयला मदत करत होता. त्यामुळे त्याच्यावर तपास यंत्रणांनी पाळत ठेवली होती. पण सलिम हा भारत सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तपास यंत्रणांनी त्याला बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस सलीमची चौकशी करत आहेत.