Ramesh Deo Death | सिनेमासृष्टीतले 'देव' हरपले, रमेश देव यांचं निधन

 ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo Death)  यांचं वयाच्या 93 वर्षी निधन झालं आहे.

Updated: Feb 2, 2022, 09:32 PM IST
Ramesh Deo Death | सिनेमासृष्टीतले 'देव' हरपले, रमेश देव यांचं निधन title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचं वयाच्या 93 वर्षी निधन झालं आहे. हृद्यविकाराच्या झटक्याने रमेश देव यांचं निधन झालं आहे. रमेश देव यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रमेश देव यांनी संपूर्ण हयात ही सिनेसृष्टीला दिली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य मराठी आणि हिंदी सिनेमात भूमिका वठवली. एका ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झाल्यानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.   (legendary actor ramesh dev passed away at age of 93 due to heart attack)

रमेश देव यांच्या सिनेकारकिर्दीची सुरुवात ही 1950 मध्ये झाली. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही आपल्या भूमिकेची छाप सोडली. सुरुवातीला त्यांना हिंदीत छोट्या भूमिका मिळाल्या. मात्र त्यानंतर त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराचा भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

अवघ्या काही दिवसांपूर्वी 93 वा वाढदिवस 

दरम्यान अवघ्या 3 दिवसांपूर्वी रमेश देव यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र वाढदिवसाच्या अवघ्या 3 दिवसांनी रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठी हाणी झाली आहे.