मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडल्यानंतर आता या दोन्ही पक्षांमध्ये कायदेशीर लढाई रंगण्याची चिन्हं आहेत.
मनसेनं कोकण भवनामध्ये विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अर्जात फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आलीये. या व्यतिरिक्त याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत संबंधित नगरसेवकांना महापालिका मुख्यालय सभागृहात प्रवेश देऊ नये, विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये आणि नगरसेवक निधीचा वापर करण्यास मनाई करावी अशी मागणी मनसेनं केलीये.
या नगरसेवकांच्या प्रवेशाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना आमदार अनिल परब यांनी केलाय. त्यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोकण भवनात कोकण उपायुक्तांची भेट घेतली.