लतादीदींच्या निधनानंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

'मूर्तिमंत संगीत हरपल...'  

Updated: Feb 6, 2022, 10:55 AM IST
लतादीदींच्या निधनानंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. पण आज अखेर 29 दिवसांची झुंज संपली आहे. त्यांच्या निधनानंतर महापौर यांनी मूर्तिमंत संगीत हरपल... असं म्हणत लतादीदींच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

महापौर म्हणाल्या, 'तेरे बिना क्या जिना' असं आज म्हणता येईल. भारतीय संगीत आज पोरके झाले आहे. मूर्तिमंत संगीत हरपले आहे. मनाला तरुण करणारा त्यांचा सूर आज हरपला. आजचा दिवस दुःखद आणि वेदना देणारा आहे...'

लतादीदींच्या निधनानंतर संगीतविश्वातील एक पर्व संपलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांत्या निधनाने समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी दीदींच्या निधनानंतर सोशल मीडिआच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.