लॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'हे' पाहण्याची वर्षातील शेवटची संधी दवडू नका

या वर्षातील सूपरमून पाहण्याची ही शेवटची संधी असेल. 

Updated: May 6, 2020, 07:07 PM IST
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'हे' पाहण्याची वर्षातील शेवटची संधी दवडू नका title=

लखनऊ : लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या मंडळींसाठी एक आनंदाची बातमी आहे. घरबसल्या तुम्हाला सूपरमूनचे दर्शन घेता येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने तो अधिक मोठा आणि आकर्षक दिसणार आहे. त्याची चमक देखील अधिक दिसेल. या वर्षातील सूपरमून पाहण्याची ही शेवटची संधी असेल. 

गुरुवारी संध्याकाळी सुर्यास्तासोबतच चंद्राचे दर्शन लोभनीय ठरणार आहे. आज सकाळी ८.३३ वाडता चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ होता. हे अंतर ३,५९, ७०० किमी इतके होते. 

या स्थितीत आल्यावर चंद्र मोठा दिसू लागतो. पण सूपरमून पाहायचा असेल तर उद्याची वाट पाहावी लागणार आहे. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मेला ४.१५ मिनिटांपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. सुर्यास्तानंतर लगेचच संध्याकाळी ६.३६ मिनिटांनी आपण सूपरमूनचा अद्भूत नजारा पाहू शकणार आहोत. 

चंद्र पेरिगी स्थितीत पौर्णिमेत आला तर सूपरमून दिसतो. वर्षात किमान १२ पौर्णिमा असतात पण पेरिगी स्थितीत चंद्र यावेळी येणे ही शक्यता कमी असते. त्यामुळे हे पाहण्यासारखे दृश्य असते. 

या वर्षातील हा शेवटचा सूपरमून असणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. चंद्र पेरीगी स्थितीत पोहोचल्याच्या १९ तास आणि ४५ मिनिटांनी दुपारी ४.१५ वाजता चंद्र पूर्णावस्थेत दिसण्यास सुरुवात होईल. त्यामुळे गुरुवारची ही संधी दवडू नका.