मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सेंट जॉर्ज, जीटी आणि नायर रूग्णालयाला भेट देऊन तेथील डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, नर्सेस इत्यादींना असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ. अनंत शिंगारे आणि डॉ. देशपांडे यांच्याशी त्यांनी चर्चा करून माहिती जाणून घेतली.
संपूर्ण देशात आज डॉक्टर्स, नर्सेस आणि सारेच आरोग्य कर्मचारी जोखीम पत्करून अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: भेटून धन्यवाद दिले. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचे हे काम संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नायर रूग्णालयात अधिष्ठाते डॉ. जोशी यांच्याशीही कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली. रूग्णालयाची सुरक्षा आणि होणार्या गर्दीचे नियंत्रण यात समतोल साधत पोलीस बंधू करीत असलेल्या धाडसी कार्यासाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा धन्यवाद दिले.
सेंट जॉर्ज रूग्णालयात त्यांनी अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ. अनंत शिंगारे आणि डॉ. देशपांडे यांच्याशी त्यांनी चर्चा करून माहिती जाणून घेतली.