अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ...

Updated: Sep 3, 2020, 09:13 PM IST
अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर एका दिवसात 391 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत असताना, कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज राज्यात 13 हजार 988  कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. 

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 43 हजार 844 इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 12 हजार 484 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 72.58 टक्के इतका झाला आहे. 

 सध्या राज्यात एकूण 2 लाख 5 हजार 428 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात 25 हजार 586 जण दगावले आहेत. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर 3.03 टक्के इतका आहे. 
 
राज्यात 14,27,316 जण होम क्वारंटाईन असून 36,745 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत राज्यात 43,72,697 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 8,43,844 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.