Breaking : राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी

Updated: Jan 28, 2022, 10:12 PM IST
Breaking : राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार title=

अहमदनगर : पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. 

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये  ५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे, लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे. त्यानंतर आता ७ हजार २०० पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.