मुंबई : काल राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा (Mpsc Main Exam) पुढे ढकलली. त्यानंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिले आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन आणि ऑनलाइन असा अभ्यास सुरु आहे. मात्र, या काळात विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय सुटली. तर, शाळा सुरु होऊन पुन्हा बंद झाली. त्यामुळे बराच अभ्यासक्रम झाला नाही. म्हणून परीक्षेला मुदवाढ द्यावी आणि कमी मार्काचा पेपर घेतला जावा अशी मागणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी केली.
त्याचप्रमणे कोविड झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं नाही. याचा सर्वांचा विचार करण्यासाठी आज एक बैठक घेतली होती. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना उशिरा घेता येतील का याचा विचार करत असल्याचं असं बच्चू कडु म्हणालेत.