लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार शहिदांचा सन्मान

३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव 

Updated: Aug 15, 2020, 11:11 AM IST
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार शहिदांचा सन्मान title=

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यावर्षी आरोग्योत्सव आयोजीत करण्यात आला आहे. त्यानिमीत्ताने विविध सामाजिक ऊपक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आज भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन..!  याचे औचित्य साधून मंडळाने, हिंदुस्थान आणि चीनच्या सीमेवर गलवान खोर्यात  चीनी शत्रूशी लढताना, देशासाठी शहीद झालेल्या वीस शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रूपये दोन लाख ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक अकाऊंटवर प्रदान करणार आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या सर्व वीस कुटुंबियांना एकुण चाळीस लाख रुपयांचा नीधी आँनलाईनच्या माध्यमातून प्रदान करणार आहे. या सर्व वीस शहिद जवानांच्या कुटुंबियांना शौर्य सन्मान चिन्हं टपालच्या माध्यामातून पोहचवण्यात आलेत. आणि हे सर्व शहिद जवानांचे कुटुंबीय आज संध्याकाळी आँनलाईन व्हिडीयो काँन्फरंसच्या माध्यमातून या ऑनलाईन गौरव सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम आज 15 ऑगस्ट 2020 दुपारी 4 वाजता  लालबागचा राजा योग केन्द्र, लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट येथे आयोजित केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीर घेण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संकल्पाला सुरुवात झाली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे जनआरोग्य वर्ष शनिवारी रक्तदान शिबिराने सुरू करण्यात आले. तर ३ ऑगस्टला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाची सुरुवात झाली आहे.