मुंबई : मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतूर भक्तांनी गर्दी केली आहे. गेल्या १२ दिवसांच्या कालावधीत ज्या भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नाही, अशा मंडळींनी मिरवणूक मार्गावर जोरदार गर्दी केली आहे. प्रत्येक भक्ताला लालबागच्या राजाजवळ जाऊन पदस्पर्श करून नमस्कार करायला मिळतोच आहे, असे नाही. रस्त्यांवर असलेल्या तोबा गर्दीमुळे अनेकांना दूरूनच नमस्कार पोहोचवावा लागत आहे. तर, काही मंडळींना मिरवणुकीत सहभागीही होत आले नाही. अशा सर्व मंडळींसाठी एक सोपा पर्याय आहे. तुम्ही लालबागच्या राजाची मिरवणुक लाईव्ह पाहू शकता. तसेच, दर्शनही घेऊ शकता. त्यासाठी Zee 24 Taas , zeenews.india.com , YouTube या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या लाडक्या राजाचे दर्शन घ्या.
दरम्यान, विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा कमालीची सज्ज झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर स्वत: या सर्व बंदोबस्तावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. विसर्जनासाठी होणारी अलोट गर्दी विचारात घेऊन या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जल, थल आणि वायू असा तिन्ही स्तरावरू मुंबईच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, एकूण ४५ हजारांहून जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन स्थळांच्या भोवती असलेल्या उंच इमारतींवर स्नेपर्स तैनात असून, यंदा २५ जणांची ड्रोन टीमही तैनात केली गेली आहे. समुद्रमार्गे संकट येऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.रहदारीचा विचार करता वाहतूक मार्गातही मोठा बदल करण्यात आला आहे.