कुर्ला आगारातील हिरकणी कक्षाची दुरावस्था

बालकांच्या विकासासाठी सुरूवातीच्या काही दिवसांमध्येबाळाला स्तनपान देणं गरजेचे असते.

Updated: Nov 1, 2017, 08:48 AM IST
कुर्ला आगारातील हिरकणी कक्षाची दुरावस्था  title=

मुंबई : बालकांच्या विकासासाठी सुरूवातीच्या काही दिवसांमध्येबाळाला स्तनपान देणं गरजेचे असते.

मात्र सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे याकरिता विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत, काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या हिरकणी कक्षाचादेखिल समावेश आहे. 

मातांना आपल्या लहान मुलांना स्तनपान करण्या करिता महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या प्रत्येक आगारा मध्ये हिरकणी कशाची स्थापना करण्यात आलीये.. मात्र आज हे हिरकणी कक्ष मातांना स्तनपान करण्यास योग्य राहिले नाहीत.. कुर्ल्यातील नेहरुनगर आगाराचीही दुरावस्था झाली आहे. कुर्ल्यातील हिरकणी कक्षामध्ये अस्वच्छता आहे, पुरूषांचा वावर असतो.