पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या, तिघींचे मृतदेह हाती

पांडवकडा हा धबधबा धोक्याचं ठिकाण असल्यानं सुरक्षा यंत्रणेकडून इथं येण्यास बंदी घालण्यात आलीय

Updated: Aug 3, 2019, 07:30 PM IST
पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या, तिघींचे मृतदेह हाती title=

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर इथल्या पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्यात. यापैंकी तिघींचे मृतदेह सापडले असून चौथ्या तरुणीचा शोध सुरू आहे.

शनिवारी सकाळी ही घटना घडलीय. या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी येऊ नये, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलंय. 

नेरुळच्या एका खासगी महाविद्यालयाचे हे चारही जण विद्यार्थी होते. जण दोन मुलं आणि पाच मुली असे एकूण सात जण धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झाले होते.

परंतु, चार मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यापैंकी तिघींचा मुलीचा मृतदेह हाती लागलाय. एकीचा शोध अद्यापही सुरू आहे. 

पांडवकडा हा धबधबा धोक्याचं ठिकाण असल्यानं सुरक्षा यंत्रणेकडून इथं येण्यास बंदी घालण्यात आलीय. तरीही मुख्य धबधबा बंद असला तरी त्याच्या आजूबाजुला अनेक छोटे मोठे धबधबे पावसाळ्यात दिसतात. त्यापैंकीच एका धबधब्याजवळ ही मुलं गेली होती.