Judicial inquiry Param Bir Singh परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी होणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय 

Updated: Mar 24, 2021, 10:59 PM IST
Judicial inquiry Param Bir Singh परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी होणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी ने सरकार घेतला आहे आहे.. या चौकशीसाठी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे. महाविकास आघाडी सरकार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणी चौकशी करणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घराबाहेर एक गाडी आणि त्यात स्फोटक सापडली आणि त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले..या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंग यांनी उचलबांगडी झाली..

परमवीर सिंग ह्यांची बदली झाल्यावर नाराज परमवीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले..आणि गृहमंत्र्यांनी सचिन वझे यान 100 कोटींचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला.

या आरोपनंतर विरोधक आक्रमक झाले. परमवीर सिंग कोर्टात गेले तर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशीच भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे सुचवले. रिबेरो यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली.

अखेरीस आज महाविकास आघडी सरकारने निर्णय घेतला की, निवृत्त न्यायमूर्ती या प्रकरणाची चौकशी करतील त्यासाठी चौकशी आयोग नेमण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा आदेश देखील निघणार आहे.

एकीकडे रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग याबाबत सरकार आक्रमक होत असताना दुसरीकडे माजी पोलीस आयुक्तांच्या आरोपांची आता चौकशी देखील होणार आहे.. एकूणच महाविकास आघाडी सरकारने आता एकत्र येऊन या प्रकरणी सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी कम्बर कसली आहे..