मुंबईत शिवसेना - भाजप यांच्यात उदघाटनावरून वाद रंगला

मुंबई मनपाचे सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजप यांच्या मनपाच्या एमपीएस या इंग्रजी शाळेच्या उदघाटनावरून वाद रंगला. 

Updated: Jul 5, 2018, 11:38 PM IST
मुंबईत शिवसेना - भाजप यांच्यात उदघाटनावरून वाद रंगला title=

मुंबई : मुंबई मनपाचे सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजप यांच्या मनपाच्या एमपीएस या इंग्रजी शाळेच्या उदघाटनावरून वाद रंगला. शाळेचं उदघाटन महापौरांच्या हस्ते झालं. मात्र शिवसेना नगरसेविका आणि आमदार यांच्या आता आरोपप्रत्यारोप सुरू झालेत. 

जोगेश्वरी पश्चिम इथे आदर्श नगर भागात २००७ मध्ये शाळेच्या राखीव भूखंडावर शाळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. म्हाडाने पालिकेची ही जागा जेबीसीएन या खासगी संस्थेला देण्यात आली. संस्था या जागेवर दोन मजली शाळा उभारून त्यातले काही वर्ग मनपाला देईल असा करार झाला. मात्र संस्थेने प्रत्यक्षात सहा मजली इमारत बांधली. सहा मजली इमारतीच्या प्रमाणात मनपाला वर्ग का देण्यात आले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आलाय. स्थानिक आमदार राजुल पटेल यांना खासगी कॉम्प्युटर क्लास सुरू करायचे असल्याने शाळा बंद करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी केलाय. 

मात्र शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी हे आरोप फेटाळलेत. या शाळेत २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांचं भवितव्य या प्रकारामुळे पणाला लागलं होतं. आता यात काही घोटाळा असल्याची त्याची चौकशी करण्यात येणार आहे.