Jellyfish: मुंबईत गणेशोत्सवाच्या आधी जेलीफिशने वाढवली चिंता, समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सतर्क

मुंबईच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा जेलीफीश पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Updated: Aug 25, 2022, 10:47 PM IST
Jellyfish: मुंबईत गणेशोत्सवाच्या आधी जेलीफिशने वाढवली चिंता, समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सतर्क title=

मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर नुकताच विषारी ब्लू बॉटल जेलीफिश मासा दिसला आहे. जेलीफिशच्या संपर्कात आल्याने जळजळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले की, विसर्जनस्थळी वैद्यकीय सुविधांसह आवश्यक औषधे ठेवण्यात येणार आहेत. गिरगाव, दादर आणि जुहू समुद्रकिनाऱ्यांवर बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते..

तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यात जेलीफिश प्रजननासाठी समुद्रकिनारी येतात. विषारी जेलीफिशला स्पर्श केल्यावर वेदना होतात. दमा असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जेलीफिशच्या विषामुळे घशात सूज येणे, हृदयविकार आणि धाप लागणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

मुंबईत जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध जुहू बीचवर टारबॉल्स आणि जेलीफिश दिसले होते, त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांना समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जेलीफिशचा डंक खूप वेदनादायक असतो.

जेलीफिश दरवर्षी पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर प्रजननासाठी येतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळा हा जेलीफिशचा प्रजनन काळ असतो. गेल्या काही वर्षांत मुंबईत 20 जण जेलीफिशचे बळी ठरल्याची माहिती आहे.