मुंबई : भाजपने चुकीच्या व्यक्तीला भोपाळमधून उमेदवारी दिली, अशी टीका आता भाजपवर होत आहे. सर्वच स्तरातून भाजवर टीका होत आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी वाह ! वाह ! वाह !, असं म्हणत भाजपला टार्गेट गेले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला भाजपने भोपाळमधून निवडणुकीचे तिकीट दिल्याने त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.
भोपाळमध्ये भाजपने केलेली उमेदवाराची निवड खरोखरच अनुकरणीय आहे. साध्वी प्रज्ञासिंह म्हणजे संघ परिवाराच्या विचार आणि कार्याचा संपूर्ण प्रसारच आहे. वाह! वाह!! वाह !!!, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी भाजपवर ट्विटरवरून टीका केली आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षानेही भाजपवर टीका केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला तिकीट देऊन भाजप सतत मुद्दे बदलत असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केली. तर मी साध्वी प्रज्ञासिंह यांचं भोपाळमध्ये स्वागत करतो. हे शांत, शिक्षित आणि सुसंस्कृत शहर तुम्हाला आवडेल, अशी गांधीकरीत साध्वींसाठी मी नर्मदा मातेकडे प्रार्थना करेल, अशी खोचक टीका दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
The choice of the BJP for The candidate in Bhopal is indeed immpeccable . Sadhvi Pragya is the perfect prosonification of sangh parivar’s thoughts and actions. Wah ! Wah !! Wah !!!
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 17, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला भोपाळमधून तिकीट देण्यात आले आहे. भोपाळमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी साध्वींचा सामना होणार आहे. भोपाळ हा भाजपचा सुरक्षित मतदार संघ मानला जात आहे. मात्र, या वादग्रस्त उमेदवारीमुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.