J J Hospital : जे.जे रुग्णालयात राजीनामा नाट्य, डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे

J J Hospital : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयात नाराजी नाट्य असल्याचं दिसून आलं आहे. नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

सुरभि जगदीश | Updated: May 31, 2023, 06:59 PM IST
J J Hospital : जे.जे रुग्णालयात राजीनामा नाट्य, डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे title=

J J Hospital : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयातील काही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं समोर आलं आहे. 

सर समूह जे.जे रूग्णालयाचीत ऑप्थेलमोलॉजी विभागातील डॉ. तात्याराव लहाने यांनी झी 24 तासला माहिती देताना सांगितलं की, 6 महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी मोतिंबिंदू शस्त्रक्रिया करण्यास दिल्या जात नाही, अशी तक्रार अधिष्ठात्यांकडे आली होती. मात्र 6 महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास दिल्या जात नाहीत. तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिकवली जाते. या विद्यार्थ्यांना ही शस्त्रक्रिया शिकवण्यात येणार होती, मात्र अधिष्ठात्यांनी या प्रकरणात खतपाणी घालून मुलांना संपावर जाण्यापर्यंत मदत केली. 

डॉ.तात्याराव लहाने सोबत डॉ.शशी कपूर, डॉ.दीपक भट, डॉ.सायली लहाने, डॉ.रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ.हमालिनी मेहता या 9 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत.

यावेळी चौकशी अधिकारी नेमले असता, आम्ही ते बदलण्याची मागणी केली होती. दरम्यान यावेळी चौकशी अधिकाऱ्यांनी एकतर्फी अहवाल सादर केला. रात्रंदिवस काम करणाऱ्या या डॉक्टरांना कोणी बाजू मांडण्यास देत नसेल तर त्याठिकाणी काम करण्यास काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सामुहिक राजीनामा दिला आहे, असंही डॉ. लहाने यांनी सांगितलं आहे.

दरम्यान याबाबत जे.जे रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता, डॉक्टरांचे राजीनामे अजून आले असल्याचं डॉ. सापळे म्हणाल्या. आणि या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.