मुख्यमंत्री योगी यांच्या राज्यात जंगलराज आहे - देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुखांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.  

Updated: Oct 1, 2020, 01:46 PM IST
मुख्यमंत्री योगी यांच्या राज्यात जंगलराज आहे - देशमुख  title=
फोटो सौजन्य : Twitter

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुखांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. दुसऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्री योगी यांच्या राज्यात जंगलराज आहे, अशी टीका  महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

उत्तरप्रदेशमधील हाथरसमधल्या सामूहिक बलात्कारातील पीडितेवर नराधमांनी अमानुष अत्याचार केले. गेले १० दिवस पीडितेच्या कुटुंबीयांची FIR नोंदवून घेतले नाही. मात्र, कुटुंबीयांच्याविरोधानंतर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी  तिच्या अंत्यसंस्काराला देखील कुटुंबीयांना येऊ दिले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, तरुणींवरील अत्याच्याराच्या घटनांनी देश हादरुन गेला. उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संतप्त पडसाद सर्व स्तरावर उमटताये. ही घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक अत्याचारी घटना समोर आली. बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. ५ ते ६ जणांनी या तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आले आहे. रात्रीच या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचे पाय आणि कंबरेचं हाड मोडण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केलाय.

तर मध्यप्रदेशमध्येही गँगरेपची घटना समोर आली आहे. खरगौनमधील झिरन्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीनं मुलीवर अत्याचार झाला. आपल्या भावाबरोबर शेतीची राखण करणाऱ्या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला.