हृदयविकाराचा झटका ही माहिती चुकीची, पाहा काय झाले आहे धनंजय मुंडे यांना

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती, ही माहिती चुकीची असल्याचं 

Updated: Apr 13, 2022, 05:56 PM IST
हृदयविकाराचा झटका ही माहिती चुकीची, पाहा काय झाले आहे धनंजय मुंडे यांना title=

बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती, ही माहिती चुकीची असल्याचं भाजपा नेत्या आणि धनंजय मुंडे यांची बहिण पंकजा मुंडे  यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी आज धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. 

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सांगितलं की, 'धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे.धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका ही चुकीची माहिती आहे, त्यांना विकनेस आला होता, भोवळ आली होती, सर्व पॅरामिटर्स सध्या चेक होत आहेत, आता ज्या पॅरामिटर्सचे निरोप आले ते सर्व नॉर्मल आहेत, मला अस वाटतं ते नॉर्मल होत आहेत, उद्या ते घरी येतील त्यांची तब्येत नॉर्मल आहे'.