महागाईचा भडका : मुंबईतही CNG महाग, PNGचे दरही वाढवण्याची शक्यता

Mumbai CNG price hike : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. राज्यात पुन्हा सीएनजीचे (CNG Price) दर वाढलेत.  

Updated: Oct 13, 2021, 11:06 AM IST
महागाईचा भडका : मुंबईतही CNG महाग, PNGचे दरही वाढवण्याची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai CNG price hike : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. राज्यात पुन्हा सीएनजीचे (CNG Price) दर वाढलेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजीचा दर 54रुपये 57 पैसे इतका झाला आहे. तर पीएनजीचे (PNG Price) दरही वाढवण्याची शक्यता आहे. (CNG price hike in Mumbai)

या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतही 12 दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजी (CNG) आणि पीएनजीचे दर वाढले आहेत. दिल्लीत आज सकाळपासून नवे दर लागू करण्यात आलेत. त्यामुळे दिल्लीत सीएनजीचा प्रति किलो दर 49 रुपये 76 पैसे इतका झाला आहे.

CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. आज राजधानी दिल्लीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असून आता सीएनजीचा दर 49.76 रुपये प्रति किलो असेल. ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले आहेत. याचा फटका दिल्ली-एनसीआरमधील लोकांना बसणार आहे.

Inflation Crisis : दरम्यान, मुंबईत आणि उपनगर शहरांत 54.57 रुपये प्रति किलो दर आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलप्रमाणे डिझेलही शंभरी पार झाले आहे. त्यामुळे महागाईला सामोरे जाणाऱ्या सामान्य जनतेच्या खिशावर एक नवा बोजा पडणार आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) मूळ किंमतीत दोन रुपये किलो आणि घरगुती पाईप केलेले नैसर्गिक वायू (PNG) दोन रुपयांनी मुंबईत आणि आसपास 54.57 रुपये प्रति किलो आणि 32.67 रुपये/SCM. महानगर गॅस असणार आहे. हा दर 5 ऑक्टोबरचा आहे.