माईल स्टोन-मैलाचा दगड सांगणार हायवेचे प्रकार

राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते यांच्या मैलाच्या दगडांना वेगवेगळा  रंग देण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 11, 2017, 06:00 PM IST
माईल स्टोन-मैलाचा दगड सांगणार हायवेचे प्रकार title=

मुंबई : माईल स्टोन अर्थात मैलाचा दगड आता आपल्या रंगावरून सांगणार आहे की, हा कोणत्या प्रकारचा हायवे असेल, यात ग्रामीण रस्ता अर्थात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने झालेला रस्ता देखील तुम्ही, मैलाच्या दगडाच्या रंगावरून ओळखू शकणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते यांच्या मैलाच्या दगडांना वेगवेगळा  रंग देण्यात आला आहे.

मात्र मैलाच्या दगडाचा रंगाचं कोडिंग करण्याआधी हे दगडचं आजकाल रस्त्यावर दिसत नाहीत, नवीन रस्ता करताना हे दगड रंगवणे तर दूरच, पण काढून फेकले जातात.

 नव्याने हे दगड लावले जात नाहीत. तेव्हा रंग ठरवणे जेवढे गंभीरतेने सरकारने घेतलं, तेवढे हे मैलाचे हरवलेले दगड पुन्हा रस्त्यावर लावणे देखील महत्वाचे आहे.