मुंबई : सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली आहे. आयकर विभागानं छगन भुजबळांच्या ३०० कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
भुजबळ यांच्या विविध ४ ठिकाणच्या मालमत्तांवर आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबईसह, नाशिकमधल्या मालममत्तांचा समावेश आहे.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, भुजबळ कुटुंबीयांनी कथित रुपात जवळपास चार डझन शेल कंपन्यांचं जाळं तयार करत ही संपत्ती मिळवलीय.
भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात बंद असलेले महाराष्ट्राचे माजी उप-मुख्यमंत्र्यांसमोर आयकर विभागाच्या या कारवाईमुळे अडचणी आणखीन वाढल्या आहेत.