आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती, 84 हजारपर्यंत मिळेल पगार

IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 31, 2023, 11:10 AM IST
आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती, 84 हजारपर्यंत मिळेल पगार title=

IIT Mumbai Job: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आयआयटी मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदाचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असून उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

आयआयटी मुंबईच्या नोटिफिकेशननुसार, प्रोजेक्ट रिसर्च सायन्टिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुख्यतः प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आयआयटी बॉम्बेने वरील-उल्लेखित पदासाठी फक्त 1 रिक्त जागा सोडली आहे. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पात्रता आणि अनुभवानुसार रु. 42,000 ते रु 84,000 (लेव्हल PR-O2) पर्यंत मासिक पगार मिळेल. निवडलेल्या उमेदवाराला "लक्ष्यित उपसंच निवड आणि सक्रिय अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण वापरून भाषण ओळखण्यात निष्पक्षता" या शीर्षकाच्या प्रकल्पावर काम करावे लागेल.

प्रोजेक्ट रिसर्च सायन्टिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएच.डी. किंवा MTech/ME/MDes/समतुल्य पदवी किंवा BTech/BE/MA/MSc/MCA/MBA/ समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.  उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान 04 वर्षांचा अनुभव असावा. 

आयआयटी मुंबईची निवड समितीसमोर उमेदवारांची मुलाखत होईल. उमेदवाराच्या अनुभव आणि कामगिरीनुसार कमी किंवा जास्त पद आणि कमी किंवा जास्त पगार दिला जाऊ शकतो. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. 

25 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील,याची उमेदवारांनी नोंद घ्या.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती 

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. कारण मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Science) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Tiss Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये  रिसर्च असोसिएट-I (Reaserch Associate),  प्रोग्राम ऑफिसर (Program Officer) आणि सोशल वर्कर (social Worker) ही पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे. 

2 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान उमेदवारांनी टीसच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.